ढकलगाडी बंद ! आता इ 5 वी व 8 वी ला होणार 'परीक्षा' ! पास नाही झालात तर होणार 'नापास' ! rte maharashtra new rules for 5th 8th students
विद्यार्थी व शिक्षक बंधुंनो दरवर्षी आपण इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना आरटीईनुसार पास करत होतो परंतु आता यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारित आरटीई नियम जारी केला असून यामध्ये आपण इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचे तरतूद ठेवली आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण आलेखामध्ये आज बघणार आहोत
♎️ आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
💥 इ 5 वी व 8 वी ला होणार 'परीक्षा' ! पास नाही झालात तर होणार 'नापास' ! rte maharashtra new rules for 5th 8th students fail
आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला असून आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे. तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय जाहीर केला आहे.
मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे.
नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -
राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा२०११मध्ये सुधारणा केली आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे.
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.
याबाबत शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा,पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल.
यात पुढे लिहिलं आहे की, जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही,तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.
💥 मुलांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा 2011 (RTE) नियम डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वरती क्लिक करा
💥 मुलांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (RTE) सुधारित नियम डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वरती क्लिक करा
💥 उपयोगी माहिती आहे खालील शेअर बटण वर क्लिक करुन आपल्या व्हाट्सअप्प वर नक्की शेअर करा !