Type Here to Get Search Results !

११वी प्रवेश प्रक्रिया पहिली / दुसरी मेरीट लिस्ट जाहीर | 11th Admission First Merit List Released | Maharashtra FYJC 1st cut-off merit list 2023 out on 11thadmission.org.in

११वी प्रवेश प्रक्रिया पहिली / दुसरी मेरीट लिस्ट जाहीर | 11th Admission First Merit List Released? 2023 | Maharashtra FYJC 1st 2ndcut-off merit list 2023 out on 11thadmission.org.in

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिनांक 21 जून 2023 रोजी सर्व विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड एक ( CAP Round 1 Result ) चा रिझल्ट लागला असून काही विद्यार्थ्यांना कॉलेज ( Allotted ) मिळाले असून काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेली नाहीत ( Not Allotted )  तर यावर आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत . या नंतर आपल्याला बरेच प्रश्न पडणार आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखा मध्ये मिळणार आहेत .


11th Admission First Merit List Released? 2023 | Maharashtra FYJC 1st cut-off merit list 2023


 

आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत(toc)



⭐ मला कोणते कॉलेज मिळाले  झाले आहे हे कसे चेक करावे ? 



  1. सर्वात अगोदर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे 
  2. लॉगिन केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला चेक अलॉटमेंट स्टेटस (check allotment status) या टॅब वर क्लिक करावे
  3. अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक केल्यावर आपला नंबर लागलेला  असेल तर Allotted असे दिसेल आणि  त्यापुढे ज्या कॉलेजला आपला नंबर लागला आहे त्या कॉलेजचे नाव तिथे दिसेल
  4. जर अलॉटमेंट स्टेटस च्या पुढे नॉट अलोटेड (Not Allotted ) असे लिहिले असेल तर समजावे की आपला आपण दिलेली दहा पसंती क्रमापैकी कुठल्याही कॉलेजमध्ये आपला नंबर लागलेला नाही

⭐ सर्व कॉलेजची CutOff लिस्ट डाऊनलोड करा २०२३




⭐  ज्या कॉलेजला माझा नंबर लागला आहे त्या कॉलेजला ऍडमिशन कसे घ्यावे ? 



 लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला Allotment/Admission या टॅब वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर ज्या कॉलेजला नंबर लागला आहे त्या कॉलेजचे सर्व माहिती दिसेल आणि सर्वात शेवटी ऍडमिशन किंवा कॅन्सल ऍडमिशन असे दोन टॅब तिथे दिसतील त्यापैकी प्रोसिड फॉर ऍडमिशन या टॅब वर क्लिक करून आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्यावे तसेच त्यांनी डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितल्यास डॉक्युमेंट अपलोड ही करावे 

त्यानंतर आपण आपल्याला कॉलेजमधून डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी व फीस भरण्यासाठी प्रत्यक्ष बोलवले जाईल किंवा ज्या कॉलेजला नंबर लागला आहे त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करून परीक्षा फीस भरावी लागणार आहे, सर्व कॉलेजची वेगवेगळी प्रोसिजर असते

♎️ Join our Whatsapp Group

➡️  Click Here



⭐ ऍडमिशन वेळेस कोणते डॉक्युमेंट लागतील ?

ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला LC मार्कशीट जर आपण मागासवर्गीय कोट्यामधून फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर तसेच रहिवासी दाखला स्वतःचे आधार कार्ड इत्यादी लिस्ट आपल्याला लागणार आहे




⭐ मला कॉलेज अलॉट झाले आहे परंतु मला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे नाही ? 

ज्या कॉलेज आपला नंबर लागलेला आहे त्या कॉलेजमध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचे नसेल तर आपल्याला कुठलीही टॅब वर म्हणजेच proceed for Admission या टॅब वर क्लिक करायचे नाही . आपण आपोआप दुसऱ्या राउंड साठी एप्लीकेबल असाल. त्यामुळे कृपया ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राउंड मध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन या टॅब वर क्लिक करू नये

लक्षात घ्या आपण पहिला पसंती क्रम ज्या कॉलेजला दिलेला होता त्या कॉलेजला जर आपला नंबर लागला असेल तर ते आपण नाकारू शकत नाही त्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घ्यावाच लागेल नाहीतर आपण तसे न केल्यास आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये  आपल्याला सहभाग घेता येणार नाही परंतु जर दुसऱ्या पसंती कमाल च्या कॉलेजला जर आपला नंबर लागला असेल तर ते आपण नाकारू शकतो व दुसरा राउंड साठी अप्लाय करू शकतो



⭐ मला जे कॉलेज अलर्ट झालेले आहेत त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नाही तर ते ऍडमिशन कॅन्सल करावे लागेल का ?


विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर आपला नंबर खूप आपल्याला कुठलेही कॉलेज मिळाले असेल परंतु त्या कॉलेजला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचे नसेल तर फक्त आपण प्रोसिड फॉर ऍडमिशन या बटन वर क्लिक करून नका बाकी आपल्याला ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी कुठेही जावे जायचे नाही


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 कसा भरावा ?



⭐ मला पहिल्या पसंती क्रमाचे कॉलेज Allotted झाले आहे काय करावे ?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर आपला आपण दिलेल्या प्रेफरन्समधील पहिल्या प्रेफरन्सच्या कॉलेजला आपला नंबर लागला असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते ऍडमिशन घ्यावेच लागेल जर ते ऍडमिशन आपण कॅन्सल केले किंवा ऍडमिशन घेतली नाही तर आपण दुसऱ्या  राऊंडमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार नाही परंतु तेच जर दुसऱ्या पसंती क्रमाचे किंवा तिसऱ्या पसंती क्रमाचे जर कॉलेज आपल्याला मिळाले असेल तर आपण दुसऱ्या राउंड साठी आपली एप्लीकेशन करू शकता



⭐ पहिल्या पसंतीच्या कॉलेज नाकारले ऍडमिशन घेतले नाही तर काय होईल ?

पहिल्या पसंतीचे कॉलेजला जर आपण ऍडमिशन घेतली नाही तर आपल्याला दुसऱ्या  राउंड मध्ये सहभाग घेता येणार नाही आणि जर सहभाग घ्यायचा असेल तर तिसऱ्या राऊंड मध्ये आपण भाग घेऊ शकता त्यामुळे पहिल्या पसंतीचे कॉलेज जर आपल्याला लागले असेल तर कृपया ते आपण कॉलेज त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे



⭐ मी पार्ट 1 किंवा पार्ट -2  भरला नाही परत मला दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेता येईल का ?

जर का एखाद्या विद्यार्थ्याने पार्ट १ किंवा पार्ट २  भरलेला नव्हता काही अडचणी आल्या होत्या तर आपण दुसऱ्या राउंड मध्ये सहभाग घेयू  शकता लवकरच वेबसाईटवर त्याची वेळापत्रक जाहीर होईल त्यानुसार आपण दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेऊ शकता


💥११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२३ २४ रजिस्ट्रेशन कसे करावे 



⭐  दुसऱ्या राउंडमध्ये भाग कधी व कसा घ्यावा

दुसऱ्या राउंड मध्ये आपण पहिल्या राऊंडची प्रक्रिया ऍडमिशन प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 21 जून पासून आपण दुसऱ्या राउंड साठी भाग घेऊ शकता दुसऱ्या राउंड मध्ये आपल्याला आपला पसंती क्रम चेंज करू शकता जर आपला पसंतीक्रम चेंज करायचा नसेल तर तसाच ठेवायचा असेल तर तोही ठेवू शकता



⭐  प्रत्येक कॉलेजची कट ऑफ किती लागली आहे कट ऑफ लिस्ट कशी डाऊनलोड करावी ?

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन मेनू बार मध्ये जाऊन आपण कट ऑफ लिस्ट डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केल्यानंतर आपण चेक करू शकता की कुठल्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागलेला आहे त्यानुसारच आपण सेकंड राउंड चे नियोजन करावे



⭐ दुसऱ्या राउंड मध्ये मी कॉलेज प्रेफरन्स चेंज करू शकतो का

दुसऱ्या राउंड मध्ये आपण दिलेल्या पसंतीक्रम बदलू शकतो परंतु पहिली 24 जून नंतर आपण ही प्रक्रिया सुरू होईल



⭐ मला ऍडमिशन घ्यायचे नाही तर मी परत रजिस्ट्रेशन करावे लागेल का

जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचे नसेल तर फक्त आपल्याला Proceed for Admission  या टॅब वर क्लिक करायचे नाही आपण आपोआप दुसऱ्या राउंड साठी ॲप्लिकेबल असाल आपल्याला कुठल्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही



⭐ मला कॉलेज अलर्ट झाली आहे परंतु मला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे नाही तर दुसऱ्या राउंड मध्ये प्रेफरन्स मध्ये त्याच कॉलेजचे नाव देता येईल का 

जर का आपला नंबर पहिल्या राउंड मध्ये एखाद्या कॉलेजला लागला असेल आणि परत त्याच कॉलेजचे दुसऱ्या राउंड मध्ये आपण शक्यतो नाव द्यायचे नाही कारण पहिल्याच राऊंड मध्ये आपण त्या कॉलेजला नाकारलेले आहे परंतु जर आपल्याला परत त्याच कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर दुसऱ्या राउंड मध्ये त्याच कॉलेजचे नाव दिल्यास आपला नंबर त्या कॉलेजला लागू शकतो परंतु जर त्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायचे नसेल तर दुसऱ्या राउंड मध्ये प्रेफरन्स मधून त्या कॉलेजचे नाव आपल्याला काढून टाकावे लागेल



⭐ मला अगोदर सायन्स स्ट्रीमला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु आता मला कॉमर्स स्ट्रीमला मला ऍडमिशन घ्यायचे तर घेता येईल का ?

पहिल्या राऊंडची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण Part 1 व part 2 मध्ये बदल करू शकता जर का आपल्याला Art मधून Science मध्ये जायचे असेल तरीही आपण जाऊ शकता म्हणजेच आपण आपली स्ट्रीम बदलू शकता


⭐ रजिस्ट्रेशन करते वेळेस मी रजिस्ट्रेशन फीस भरली होती तर परत मला दुसऱ्या राउंड साठी रजिस्ट्रेशन फीस भरावी लागेल का

एकदा रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर आपल्याला परत रजिस्ट्रेशन फीस भरावी लागत नाही



⭐ मला लॉटेड कॉलेज अलोटेड झाली आहे मेसेज आला नाही तर काय करावे

प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला कुठली कॉलेज मिळाले आहे याचा मोबाईल वर मेसेज आलेला असतो काहींना मेसेज नाही आला तर लॉगिन करून आपण आपले स्टेटस चेक करू शकता



⭐ मी दहा प्रेफरन्स टाकले होते परंतु मला एकही कॉलेजला ऍडमिशन मिळाले नाही असे का ?

आपण दहा पसंती क्रम हे कुठले टाकले आहे त्या कॉलेजचा कटऑफ जास्त  आहे व आपल्याला गुण कमी आहेत त्यामुळे आपला कुठल्याही कॉलेजला नंबर लागलेला नाही त्यामुळे आपण वेबसाईट वरील कट ऑफ लिस्ट डाऊनलोड करून प्रत्येक कॉलेजचा कटऑफ चेक करा त्यानंतरच दुसऱ्या राउंड मधील पसंती क्रम टाकावे जेणेकरून आपल्याला ऍडमिशन मिळेल



⭐ मला 80 टक्के आहे पण मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजची कटऑफ 90 टक्के लागली आहे तर मला दुसरा राउंड मध्ये नंबर लागेल का ?

लक्षात घ्या पहिल्या राऊंडमध्ये जवळपास 60 टक्के जागा भरल्या जातात दुसऱ्या राउंड मध्ये 20% तिसरा राउंड मध्ये वीस टक्क अशा जागा भरल्या जात असतात त्यामुळे प्रत्येक कॉलेजचा कटऑफ चेक करा त्या कॉलेजमध्ये सध्या किती वेकेन्सी आहेत ते चेक करा त्यानंतरच आपल्याला पसंती क्रम मधील कॉलेज निवडायचे आहेत 



 ⭐ मी चुकून प्रोसेस फॉर ऍडमिशन बटन वर क्लिक केले आहे आता काय करू ? 

आपण जर प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन वर क्लिक केले तर आपल्याला ऍडमिशन घ्यावेच लागेल ते कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल होत नाही आणि जर का ते कॅन्सल करायचे झाल्यास आपल्याला दुसऱ्या राउंड मध्ये सहभाग घेता येणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे


⭐ प्रत्येक कॉलेजमध्ये किती वेकेन्सी आहे हे कसे बघावे

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वरील मेनू बारमध्ये आपण प्रत्येक शाळेची कट ऑफ लिस्ट वेकेन्सी लिस्ट डाऊनलोड करून चेक करू शकता



⭐ मला कॉलेज अलाउड झालेले आहे तिथे ऍडमिशन फीस किती असेल

आपला नंबर जर  अनुदानित कॉलेज मध्ये लागला असेल तर फीस कमी असते परंतु विनाअनुदानित किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल तर जवळपास आपल्याला दहा ते पंधरा हजार एवढी फीस लागेल


💥ज्यांनी अजून १ भाग भरला नाही त्यांनी क्लिक करा. 

💥 मागील वर्षीचा सर्व कॉलेज चे CutOff लिस्ट डाऊनलोड करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !