Type Here to Get Search Results !

🔵 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी २०२३ | dr babasaheb ambedkar speech in marathi 2023 | dr babasaheb ambedkar jayanti bhashan

🔵डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी २०२३ | डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण | dr babasaheb ambedkar speech in marathi 2023 pdf download

 नमस्कार आज १४ एप्रिल आज आपल्या बाबासाहेबांची जयंती . तुम्ही जर विद्यार्थी शिक्षक छोटे मुल असाल आणि तुम्हांला डॉ बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन कविता चारोळी फलक लेखन ( dr babasaheb ambedkar speech in marathi ) पाहिजे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात . आपण आज या लेख मध्ये डॉ बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन कविता चारोळी फलक लेखन ( dr babasaheb ambedkar bhashan ) बघणार आहोत त्याचा नक्कीच तुम्हांला शाळा कॉलेज मध्ये भाषण निबंध सूत्रसंचालन pdf download करण्यासाठी होईल . चला तर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणाला सुरवात करूया , तुम्हांला सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा .


 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण २०२३ (toc)

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी २०२३ |  dr babasaheb ambedkar speech in marathi 2023 pdf download

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांची पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी 1908 मध्ये मॅट्रिक पास केले. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेविरोधी निकराने लढा दिला. 1920 मध्ये त्यांनी मूकनायक नावाचे वर्तमानपत्र सुरु केले. 25 डिसेंबर 1927 रोजी मुंबई येथे त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. ते एक घटना तज्ञ होते. अनेक देशांच्या राज्यघटनेचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. डॉक्टर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांचे ग्रंथालय राजगृह हे पन्नास हजार हून अधिक पुस्तके असलेले जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या पत्नी यांनी लाखो समर्थकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर आंबेडकर यांना देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर 10 ओळींचे छोट्या मुलांसाठी भाषण

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते.
  2. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.
  3. त्यांच्या पडीलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते.
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शाळेय जीवनात १८ तास दररोज अभ्यास करत. 
  5. ते अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते.
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते.
  7. त्यांनी भारतीयांना 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" ''हा गुरुमंत्र दिला.
  8. त्यांनी इ. स. १९२० मध्ये 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
  9. इ. स. १९९० मध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. 
  10. त्यांनी अखेरचा श्वास 6 डिसेंबर 1956 घेतला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण |  dr babasaheb ambedkar bhashan

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नावे रामजी तर आईचे नाव भीमाबाई हे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन एम.ए. पीएच.डी. या अर्थशास्त्र विषयात' पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूस मिळवून देणारे अलौ- किक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश. मनुस्मृती दहन, हिंदू कोड बील अशी इतर अनेक सामाजिक कार्ये केली. स्त्री वर्ग, शेतकरी, मजूर, पददलित, समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म' स्वीकारला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' हा अमूल्य संदेश समाजाला दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा आहे. अश्या या थोर महामानवाचे दडिसें- बर १९५६ रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. डॉ. बाबासाहेब हे भारताचेच नाही -तर या विश्वाचे महामानव आहेत. त्यांची जयंती आपण दरवर्षी १४ एप्रिलला 'आंबेडकर जयंती' व पुण्यतिथी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण 

दिन' म्हणून साजरी करतो. असे हे सर्वांना वंदनीय असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर  |  speech on doctor babasaheb ambedkar in marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल साली झाला. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या वडीलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हुशार प् महत्वाकांक्षी होते. ते भारतीय न्यायशास्त्रत, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते

डॉ. बाबासाहेब लहान असताना त्यांना वर्गान बसू दिले जायचे नाही. दारात बसून त्यांनी आपके शिक्षण घेतले दलित समाजात जन्माला आल्याने त्यांच्या. सोबत भेदभाव केला जात होता.

बाबासाहेब त्यांच्या शाळेय जीवनात १८ नाम अभ्यास करायचे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय, संविधानाचे शिल्पकार होत. हिंदू फोड बीळातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरचा पारसा हकु दिला. तसेच महिलांना पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार दिला गेला.

"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा"

हा मूलमंत्र त्यांनी दिला. स्त्री हक्कांसाठी ते लड़ने त्या काळी समाजात अस्पृश्यता, जातीभेद खूप मोठया प्रमाणात होता. त्याविरुद्ध त्यांनी चळवळ उमा केली. दलित लोकांनाही समान वागणूक मिळावी यासाठी लढा दिला. त्यांना 'भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या महान व्यक्तीचा महापरिनिर्वान दिन ६ डिसेंबर (१९५६) रोजी साजरा केला जातो.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध भाषण  |  dr babasaheb ambedkar essay in marathi


जगामध्ये गरिबी तेथेच आहे, "जिथे शिक्षण नाही... म्हणून अर्धी भाकरी, खा, पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा.....

सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरूजन आणि चांदणाप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर योच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो......

मित्रांनो, आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। आपणा सर्वांना मीमजयंती च्या हार्दिक शुभेच्छा !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९९ रोजी मध्य प्रदेशातील महू यागावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे आसमंत ठरला, यात तिळमात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पदव्या संपादन केल्या.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'. 

हा क्रान्तिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. अनेक वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेचा नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुध्दा मिळणे कठीन होते. अशा दिन दलितांच्या व्यथा जाणून, त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य, तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.. अशा या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले.जय हिंद| जय भारत | जय भीम |


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | dr babasaheb ambedkar jayanti bhashan 


नमन त्या पराक्रमाला 

नमन त्या देश प्रेमाला

नमन त्या ज्ञानदेवतेला

नमन त्या महापुरुषाला

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना "


नमस्कार मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी  14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्विकारला होता. त्यांना लोक 'बोधिसत्व ' मानतात. डॉ. बाबासाहेबांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अस्पृश्यता संपवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच ते बौद्ध गुरु मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथी साठी बौद्ध संकल्पने मधील 'महापरिनिर्वाण' हा शब्दघेण्यात आला आहे. अश्या महामानवाचा स्मृतिदिन 6 डिसेंबर  हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरा केला जातो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसे.1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले.अशा या महामानवास माझे कोटी-कोटी अभिवादन! धन्यवाद !


भीमजयंती भाषण मराठी छोटे व सोप्पे भाषण |  14 april speech in marathi 


"मोजू तरी कशी उंची,

तुमच्या कर्तृत्वाची 

तुम्ही जगाला शिकवली,

व्याख्या माणूसकीची!”


आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, पुज्य गुरुजनवर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो.. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातीन महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी, तर आईचे नाव भिमाबाई होते. उच्चवर्णीयांकडून वर्षानुवर्ष होणाऱ्या पिळवणु- कीजे दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जासत करण्याचे अवघड कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळे येथे सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीडी सत्याग्रह करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले.

जय हिन्द ! जय भारत! जय भीम !


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण दाखवा doctor bheemrav ambedkar speech




डॉ बाबासाहेब आंबेडकरजयंती २०२३ 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते.
महापरिनिर्वाण म्हणजे काय ?आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय?6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला होता त्याच दिवसाला महापरिनिर्वाण दिन म्हणतात.सौ. विकिपीडिया
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी कोठे आहेत?डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी दादर चैत्यभूमी मुंबई येथे आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !