Type Here to Get Search Results !

🌺 मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठी पुस्तक २०२४ | margashirsha guruvar mahalaxmi vrat katha marathi book pdf 2024

🌺 मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठी पुस्तक pdf | श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी २०२४| margashirsha guruvar katha marathi | mahalaxmi vrat katha marathi  pdf 2024


नमस्कार माझ्या मार्गशीर्ष गुरुवार 2024 वृत्त करणाऱ्या माझ्या माता भगिनींनो  तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात सर्वात जास्त आवश्यकता असते ती मार्गशीष वृत्ताची कहाणी व आरती म्हणजेच श्री महालक्ष्मी व्रताची कहानी वाचण्याची किंवा pdf स्वरूपात हवी असते ( margashirsha guruvar mahalaxmi vrat katha marathi pfd book  ) तुमच्या याच प्रश्नांची उत्तर लेखांमध्ये मिळणार आहेत .  तुम्हाला या लेखांमध्ये मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची कहाणी pdf  स्वरूपात मिळणार असून तुम्ही  महालक्ष्मी व्रताची कहाणी गुरुवारची कहाणी वाचूही शकतात चला तर लेखाला सुरुवात करूया .


मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी मराठी pdf download lyrics book

महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक pdf

मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठी पुस्तक pdf 




🌺 मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी 2024 pdf मराठी मध्ये सुरुवात करूया .


सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड, कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली. या कन्येचे नाव शामबाला होतं.
एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जावून राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्री चे रुप धारण करुन भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्री चे रुप धारण करुनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. 
त्यावर वृद्ध स्त्रीच्या रुपातील लक्ष्मी देवीने सांगितले की, तुझी राणी मागच्या जम्नात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरुन ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्रय नष्ट झालं.
लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करुन द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महलात जावून राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. 
मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शामबाला भेटते. शामबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागवीते. देला तिची दया येते आणि ती मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. 
तो दिवस मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्रय पाहून राणी राजाला विनंती करते की, आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. 
तेव्हा तो राणी शामबालाचा वडिल असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात.नशीबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरतचंद्रीका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करु लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात.
काही दिवसांनंतर शामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्यं ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करुन न घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते.
सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरुन काय आणणलंस? त्यावर ती उत्तरते मी तिथेलं सारआणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शामबाला पानात थोडसं मीठ वाढतो. त्या मीठाने साऱ्या अन्नाला चव येते.
तेव्हा शामबाला म्हणते, हेचा आहे माहेरुन आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो.
त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले.

महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥
ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।


अश्या प्रकारे आपली मार्गशीर्ष गुरुवार 2022 श्री महालक्ष्मी व्रताची कहानी  margashirsha guruvar mahalaxmi vrat katha marathi संपलेली असून तुम्हांला सुद्धा मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रताची कहानी पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा .


🌺 महालक्ष्मी व्रत कथा pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा

Download PDF


Download pdf



🌺 मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी साहित्य व संपूर्ण माहिती चा व्हिडिओ नक्की बघा 


➡️ https://youtu.be/oj0MlVssNYY


💥 हे पण वाचा-

🆕  मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी व पूजा मांडावी माहिती.

🆕 संविधान दिन भाषण व सूत्रसंचालन pdf

🆕 दत्त जयंती मराठी माहिती व आरती pdf

🆕 हरतालिका आरती मराठी lyrics

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics

FAQ-

Q.मार्गशीष महिना गुरुवार व्रत कधी सुरू होणार आहे 2024?

Ans- मार्गशीष महिना गुरुवार व्रत 02 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.
Q.मार्गशीष महिना पहिला गुरुवार कधी आहे 2024?
Ans- मार्गशीष महिना पहिला गुरुवार 05 डिसेंबर नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
Q.मार्गशीष महिना शेवटचा गुरुवार कधी आहे 2024?
Ans- मार्गशीष महिना शेवटचा गुरुवार 26 डिसेंबर 2024 रोजी आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !